नवी दिल्ली – नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून सातव्यांदा अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात सात वर्षात त्यांचा हा अमेरिका दौरा महत्त्वाचा मानला जातो. कारण नवनिर्वाचित अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी त्यांची ही पहिली भेट असेल.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामा यांच्याशी मोदींचे संबंध स्नेहपूर्वक राहीले आहेत, त्यांच्या भेटीमुळे केवळ भारत-अमेरिकाच नव्हे तर जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधले गेले आहे. 2014 च्या मॅडिसन स्क्वेअरपासून 2019 च्या हाउडी मोदी कार्यक्रमापर्यंत बरीच चर्चा झाली. मोदींच्या 7 परदेश भेटी कोणत्या कारणांमुळे जगद्विख्यात ठरल्या ते जाणून घेऊ या ….
2014: मॅडिसन स्क्वेअरमधील स्थलांतरितांची मने जिंकली
मे 2014 मध्ये पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये मोदींनी पहिला अमेरिका दौरा केला. मग मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये हिंदीतले त्यांचे भाषण खूप गाजले. या कार्यक्रमाची इतकी चर्चा झाली की, त्याला “मोडिसन गार्डन” असे म्हटले गेले. त्यांच्या पहिल्या भेटीत मोदींनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले.
2015: टेक कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठक
नरेंद्र मोदी त्यांनतर अगदी बरोबर एका वर्षानंतर सप्टेंबर 2015 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करण्यासाठी अमेरिकेत गेले. येथे त्यांनी भारतीय तंत्रज्ञान-उद्योजकांच्या सिलिकॉन व्हॅलीचा प्रवास केला. यावेळी त्यांनी गुगल, फेसबुक आणि टेस्ला मोटर्सच्या कॅम्पसला भेट दिली.
2016
या वर्षी दोनदा अमेरिकेला भेट दिली, मार्च 2016 मध्ये नरेंद्र मोदी दोन दिवसीय अणु सुरक्षा शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी वॉशिंग्टनला गेले होते, त्यात 50 देशांचे नेते उपस्थित होते. त्यानंतर 2016 याचवर्षी जूनमध्ये मोदी पुन्हा अमेरिकेत गेले जिथे त्यांनी अमेरिकन संसदेच्या युनायटेड हाऊसला संबोधित केले. हा सन्मान मिळवणारे ते भारताचे पाचवे पंतप्रधान ठरले.
2017
ट्रम्प यांच्यासोबत पहिली भेट या वर्षी जूनमध्ये मोदी अमेरिकेचे नवे अध्यक्ष ट्रम्प यांना भेटण्यासाठी अमेरिकेत पोहोचले. ट्रम्प यांच्याशी मोदी यांचा संवाद अपेक्षेपेक्षा चांगला होता. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच व्हाईट हाऊसमध्ये ‘वर्किंग डिनर’ साठी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
2019
हाउडी मोदींनी म्हटले – सर्व काही ठिक होईल : 2019 च्या सप्टेंबरमध्ये मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करण्यासाठी अमेरिकेत गेले. यावेळी मोदींच्या भेटण्यासाठी भारतीयांनी’ हाउडी मोदी ‘ हा मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला, यात त्यांनी स्थलांतरितांना सांगितले की, भारतात सर्व काही ठीक होईल.
2021: जो बायडेन यांची भेट
कोरोना काळात नरेंद्र मोदींची ही पहिलीच अमेरिका भेट असून ते नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. अनिवासी भारतीयांसोबत भावनिक बंध निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या मोदींनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली असून मोदी येथे क्वाड शिखर आणि संयुक्त राष्ट्र महासभेलाही संबोधित करणार आहेत.