मुंबई – कोरोनाविरूद्धचे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य देण्यात येईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमात म्हणाले, त्यांनी यावेळी मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी संवाद साधला.
डॉ. जोशी देशातील सर्वोत्तम डायबेटोलॉजिस्ट, पद्मश्री आणि राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्स चे सदस्य आहेत. त्यावेळी डॉक्टर शशांक जोशी म्हणाले की, कोरोनाची ही जी दुसरी लाट आली आहे, ती खूप वेगानं आली आहे आणि पहिल्या लाटेपेक्षा विषाणुच्या संसर्गाची गति जोरात आहे. परंतु, त्याच्या संसर्गापेक्षाही जास्त गतिनं लोक बरे होत आहेत आणि मृत्युदरही खूप कमी आहे, ही याच्याबाबतीत दिलासादायक गोष्ट आहे. या लाटेबाबत दोन- तीन फरक आहेत. पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग युवक आणि मुलांमध्येही थोडा दिसून येत आहे. त्याची जी श्वास लागणं, कोरडा खोकला येणं, ताप येणं ही पहिल्या लाटेसारखी लक्षणं तर आहेतच, परंतु त्याबरोबर वासाची जाणिव नष्ट होणं, चव न लागणं हीही आहेत. आणि लोक थोडे घाबरले आहेत. खरंतर लोकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाहि. 80 ते 90 टक्के लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणं दिसत नाही.
डॉ जोशी पुढे म्हणाले की “हल्ली एक नवीन प्रयोगात्मक औषध ज्याचं नाव रेमडिसिवीर आहे. त्याच्या वापरामुळे रूग्णाचा रूग्णालयात रहाण्याचा कालावधी दोन ते तीन दिवसांनी कमी होतो आणि क्लिनिकल रिकव्हरीमध्ये त्याची मदत होते. आणि हे ही औषध पहिल्या नऊ ते दहा दिवसात दिलं तरच काम करतं आणि पाचच दिवस ते देता येतं. परंतु असं पाहिलं गेलं आहे की, लोक रेमडेसिवीरच्या मागे धावत सुटले आहेत. असं मुळीच धावता कामा नये. हे औषध थोड्या प्रमाणातच काम करतं.”
▶️@mannkibaat कार्यक्रमात पंतप्रधानांचा मुंबईच्या डॉ शशांक जोशींशी संवाद
?https://t.co/t3VMJMrqEz pic.twitter.com/DpVPlDQ4Ly
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 25, 2021