इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवच्या राजकीय दौऱ्यावर राजधानी मालेमध्ये सकाळी दाखल झाले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपतीसह अख्ख मंत्रिमंडळ स्वागतासाठी विमानतळावर हजर होतं. हा दौरा ऐतिहासिक असून त्यातून या दोन्ही देशातील बिघडलेले संबध पुन्हा सुधारणार आहे.
मालदीवच्या ६० वा स्वातंत्रदिन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे. यावर्षी भारत आणि मालदीवच्या राजनैतिक संबधांना ६० वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा तिसरा कार्यकाळ स्वीकारल्यानंतरचा पहिलाच मालदीव दौरा आहे.
दोन वर्षापूर्वी दोन्ही देशातील संबध ताणले गेले होते. याला मालदीवचे राष्ट्रपती जबाबदार होते. त्यांनी मालदिवची सत्ता मिळवण्यासाठी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यामुळे बॅायकॅाट इंडिया पासून वेलकम मोदी पर्यंत हा प्रवास चर्चेचा ठरला आहे.