विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. कोरोनाची दुसरी लाट, देशासमोरील आव्हाने यासंदर्भात त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. त्यांच्या भाषणाचे प्रमुख मुद्दे असे
– येत्या २१ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांना केंद्र सरकार मोफत लस देणार
– देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार
– येत्या २ आठवड्यात लसीकरणात बदल होईल आणि राज्यांची जबाबदारी केंद्र सरकार घेईल
– एकूण लस उत्पादनातील ७५ टक्के लस ही केंद्र सरकार खरेदी करेल
– केंद्र सरकार राज्य सरकारांना मोफत लस उपलब्ध करुन देईल
– कोरोना ही गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठी महामारी आहे
– आजवर देशात कधीच ऑक्सिजन आणि बेडची मागणी झाली नाही ती दुसऱ्या लाटेत झाली
– लसीबाबत अफवा पसरविणारे हे देशातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका
– केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही येत्या दिवाळीपर्यंत सुरू राहिल. गरिबांच्या सोबत सरकार आहे. त्यांना एकटे सोडले जाणार नाही. देशातील ८० कोटीहून अधिक नागरिकांना दर महिन्याला मोफत धान्य मिळेल
– खासगी हॉस्पिटल किंवा लसीकरण केंद्रात प्रत्येक डोस हा निर्धारीत किंमतीपेक्षा केवळ १५० रुपये सर्विस चार्ज घेईल. त्यापेक्षा अधिक घेण्यास त्यांना परवानगी नसेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी खालील निळ्या गोलवर क्लिक करा
https://twitter.com/narendramodi/status/1401864166684585989