नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करीत आहेत. देशातील कोरोना प्रादुर्भाव आणि सद्यस्थिती याविषयी तेे बोलत आहेत. आजच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. त्यात झालेल्या निर्णयाबद्दलही ते माहिती देत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की,
लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यापासून आपल्याला वाचायचे आहे.
आपल्याला सर्वांना मिळून ही लढाई लढायची आहे.
१ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस मिळेल
कोरोना योद्ध्यांना मी नमन करतो.
ऑक्सिजन, औषधे, बेड आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे
उद्या रामनवमी आहे
प्रभू श्रीरामांनी आपल्याला मर्यादा शिकविली आहे. त्यामुळे आपल्याला कोरोनाच्या मर्यादांचे पालन करायचे आहे.
मास्क वापरायला हवा. सतत हात धुणे आवश्यक आहे.
देशासमोर गंभीर संकट आहे. पण, ते अशक्य मुळीच नाही
आपण सर्वांनी ठरविले तर आपण या संकटावर निश्चितच मात करु
सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे ही सुद्धा देशसेवाच आहे.
कुणीही घाबरुन जाऊ नका.
सरकार सर्व देश तुमच्यासोबत आहे.
आपण नक्कीच ही लढाई जिंकू. त्यासाठी सर्वांची सोबत हवी.
कृपया दिलेल्या निर्देशांचे पालन करा. आपण कोरोनावर मात करु
https://twitter.com/narendramodi/status/1384526068091035654?s=0