नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रुनेई, दारुसलेम आणि सिंगापूर दौऱ्यावर आहे. प्रस्थान करण्यापूर्वी त्यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी सांगितले की, मी आज ब्रुनेई दारुसलेमच्या पहिल्याच द्विपक्षीय दौऱ्यासाठी रवाना होत आहे. आम्ही आपसांतील ४० वर्षांची धोरणात्मक भागीदारी साजरी करत असताना हे ऐतिहासिक संबंध अधिक उंचीवर नेण्याच्या उद्देशाने महामहिम सुलतान हाजी हसनल बोलकिया आणि राजघराण्यातील इतर आदरणीय सदस्यांसोबतच्या होणाऱ्या बैठकींबाबत मी उत्सुक आहे.
ब्रुनेईहून मी ४ सप्टेंबरला सिंगापूरला जाणार आहे. मी राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम, पंतप्रधान लॉरेन्स वोंग, ज्येष्ठ मंत्री ली सिएन लूंग आणि एमेरिटसचे ज्येष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांना भेटण्याच्या संधीची वाट पाहत आहे. मी सिंगापूर मधील अतिशय चैतन्यदायी अशा उद्योगधुरिणांना देखील भेटणार आहे.
मी विशेषतः प्रगत उत्पादन, डिजिटलायझेशन आणि शाश्वत विकास अशा नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रात सिंगापूर सोबतची आपली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे.
आमचे ऍक्ट ईस्ट धोरण आणि हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या अनुषंगाने हे दोन्ही देश महत्त्वाचे भागीदार आहेत. मला विश्वास आहे की माझ्या भेटीमुळे ब्रुनेई, सिंगापूर आणि मोठ्या प्रमाणावरील आसियान प्रदेशासोबतची आमची भागीदारी आणखी मजबूत होईल.