इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यानं अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादले. यासंदर्भातल्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. गेल्याच आठवड्यात त्यांनी विद्यमान करांच्या व्यतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. या आदेशामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होण्याऱ्या वस्तूंवर एकूण अतिरीक्त ५० टक्के कर द्यावा लागेल. भारतानं किंवा रशियानं धोरणात बदल केला तर किंवा परिस्थिती बदलली तर लागू केलेल्या अतिरीक्त शुल्कात बदल करण्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता प्रत्त्युत्तर दिले आहे. आमच्यासाठी आमच्या शेतक-यांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. शेतक-यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करणे या ध्येयांवर आम्ही सतत काम करत आहोत असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.