इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्पराबादमध्ये ९ ठिकाणावर स्टराइक केला आहे. पंतप्रधान स्वत: आऑपरेशन मॅानिटर करत होते. ९ टार्गेट ठेवण्यात आले होते. ९ च्या ८ टार्गेट यशस्वी झाले आहेत. भारताने आपल्या हद्दीत राहून हा हवाई हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, थोड्या वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले आणि निर्देशित केले गेले.
एकूण नऊ (९) स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यात पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तळांना टार्गेट केले आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा RAW ने सर्व टार्गेटस निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.