इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राऊन्ड येथे वार्षिक राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) पीएम रॅलीला संबोधित करणार आहेत.
या वर्षी प्रजासत्ताक दिन शिबिरात राष्ट्रीय छात्र सेनेचे एकूण 2361 छात्र सहभागी झाले होते. यापैकी 917 छात्र बालिका छात्र होत्या. या शिबिरात बालिका छात्रांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग होता. पीएम रॅलीमध्ये या छात्रांच्या सहभागाने नवी दिल्ली येथे महिनाभर चाललेल्या राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 चा यशस्वी समारोप होईल. या वर्षीच्या छात्र सेनेच्या पीएम रॅलीची संकल्पना ‘युवा शक्ती, विकसित भारत’ अशी आहे.
या दिवशी, 800 हून अधिक छात्र, राष्ट्र उभारणीप्रती राष्ट्रीय छात्र सेनेची वचनबद्धता दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या 18 देशांमधील 144 तरुण छात्रांचा सहभाग या वर्षीच्या रॅलीमध्ये सहभाग कार्यक्रमाची रंगत वाढवेल.
देशभरातील मेरा युवा (माय) भारत, शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे 650 हून अधिक स्वयंसेवक एनसीसी पीएम रॅलीमध्ये विशेष पाहुणे म्हणून सहभागी होतील.