इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पोप फ्रान्सिस यांनी जॉर्ज जेकब कूवाकड यांची पवित्र रोमन कॅथॉलिक चर्चचे कार्डिनल म्हणून नियुक्ती केल्याबद्दल आपल्याला अत्यंत आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर संदेश लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया : भारतासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट!
परमपूज्य पोप फ्रान्सिस यांनी जॉर्ज जेकब कूवाकड यांची पवित्र रोमन कॅथलिक चर्चचे कार्डिनल म्हणून नियुक्ती केल्याचे ऐकून आनंद झाला. आदरणीय जॉर्ज कार्डिनल कूवाकड यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे निष्ठावान अनुयायी म्हणून आपले अवघे जीवन मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा.