इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस पक्षाला माहीत आहे की, देश जितका कमकुवत होईल तेवढी काँग्रेस मजबूत होईल त्यामुळेच ते वेगवेगळ्या जातींमध्ये भांडण लावत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या घातक कारस्थानापासून सावध राहा. तुम्ही लक्षात ठेवा एक रहेंगे तो सेफ रहेंगे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
अकोले येथे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करतांना त्यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीवर टीका करतांना सांगितले की, महाराष्ट्रात आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. महाराष्ट्राला महाआघाडीच्या मेगा घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आज ९ नोव्हेंबर आहे आणि ही एक ऐतिहासिक तारीख आहे. २०१९ मध्ये याच दिवशी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निर्णय दिला होता. ९ नोव्हेंबर ही तारीख देखील लक्षात राहील कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रत्येक धर्माच्या लोकांनी प्रचंड संवेदनशीलता दाखवली. राष्ट्र प्रथम ही भावना भारताची मोठी ताकद आहे.
यावेळी त्यांनी माझ्यासाठी महाराष्ट्राच्या सेवेचं सुखचं वेगळं असल्याचेही सांगितले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उद्योग आणि पायाभूत सुविधा या दोन्हींना चालना देण्यात येत आहे. मी महाराष्ट्रात एका टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केली आहे. टेक्स्टाइल पार्कमुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी समृद्धीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत-