नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यता आला. त्यांच्या हस्ते स्वागरगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजनही होणार होते. हा दौरा तात्पूरता रद्द करण्यात आला असली तरी नवी तारीख अद्याप जाहीर करण्यात आली आहे.
आज मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण होणार होते.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण आज होणार होता. त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत विभागाचा खर्च सुमारे १ हजार ८१० कोटी रुपये आहे. याशिवाय सुमारे २९५० कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो फेज-१ च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणीही होती. मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह सुमारे ५.४६ कि. मी. चा हा दक्षिणेकडील विस्तार पूर्णपणे भूमिगत आहे.
प्रधानमंत्री भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी. सुपरकंप्युटिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री तीन परम रुद्र सुपरकंप्युटर राष्ट्राला समर्पित करणे, यासारखे विविध कार्यक्रम होते. आता ते पुढील ताऱीख दिल्यानंतर होणार आहे.