नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक सेमीफायनल्समध्ये मंगळवारी भारतीय हॉकी संघाचा ५-२ अशा फरकाने बेल्जियमने पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाचं कौतुक केले आहे. त्यामुळे या पुरुष हॅाकी टीमचे मनोबल उंचावणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने त्यांची सर्वोत्तम खेळी केली असून आपल्या दृष्टीने तेच महत्वपूर्ण आहे. त्यांनी संघाला आगामी सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या. आपली ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले; जय आणि पराभव हे जीवनाचे भाग आहेत टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये आपल्या पुरुष हॉकी संघाने त्यांची सर्वोत्तम खेळी केली आणि तेच महत्त्वाचे आहे. संघाला आगामी सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1422396362172162052?s=20