नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना एप्रिल-जुलै २०२२ च्या मदती ३१ मार्च २०२२ पर्यंत ‘ई-केवायसी’ पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे. तशी सूचना कृषी आयुक्तालयाने केली आहे.
विशेष जनजागृती मोहिम राबवून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmer Corner या टॅब मध्ये किंवा पी. एम. किसान अॅपद्वारे ओटीपी प्राप्त करून लाभार्थीना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.
ग्राहक सेवा केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्या साठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. 15 फक्त निश्चित करण्यात आले आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.