बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यातील जवळपास १३ लाख शेतकरी अडचणीत; पीएम किसानचे पैसे मिळणे होणार बंद

by India Darpan
मे 4, 2023 | 5:03 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
PM Kisan

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी 6 हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट ऑफीसात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचा लाभ माहे मे किंवा जून मध्ये जमा होणार असून केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत 12 लाख 91 हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट बँकत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

पी.एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून तो आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थीना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबी मार्फत 15 मे 2023 पर्यंत गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे. आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी आयुक्त श्री. चव्हाण यांनी केले आहे.

PM Kisan Scheme Maharashtra 13 Lakh Farmers

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटने जो़डणार… दुर्गम भागात हे तंत्रज्ञान वापरणार… शिक्षणमंत्र्यांची माहिती

India Darpan

Next Post
7 2 1140x570 1

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटने जो़डणार... दुर्गम भागात हे तंत्रज्ञान वापरणार... शिक्षणमंत्र्यांची माहिती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011