मुंबई – केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री (पीएम ) किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. परंतु या योजनेचा लाखो अपात्र ग्रामस्थ ६ हजार रुपयांचा वार्षिक फायदा देखील घेत आहेत. त्यामुळे संबधित राज्य सरकारांनी नवीन यादीतून अपात्र शेतकऱ्यांची नावे कापण्यास सुरुवात केली.
त्याच वेळी काही शेतकरी असेही आहेत, ज्यांचा हप्ता आधार लिंक न झाल्यामुळे रखडला आहे, आधार कार्डवरील नावात त्रुटी आणि बँक खात्याच्या नावावर आधार प्रमाणीकरण अयशस्वी झाल्यामुळे हप्ता जमा झाला नाही. वास्तविक पुढील हप्ता १५ डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. त्यामुळे एकदा तुमचे नाव पंतप्रधान किसान लाभार्थ्यांच्या नवीन यादीत आहे की नाही हे तपासून पाहायला हवे?
पीएम किसान पोर्टलवर दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्य सरकारने सुमारे १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे पेमेंट थांबवले आहे, तर ३१ लाखांहून अधिक लोकांचा डेटा पीएफएमएसने नाकारला आहे. पीएम किसान पोर्टल ला भेट देऊन तुम्ही संपूर्ण गावाची यादी देखील पाहू शकता. इथे तुम्हाला कळेल की कोणाच्या खात्यात पैसे येत आहेत आणि कोणाच्या खात्यात काय चूक झाली. हे जाणून घ्या, त्यासाठी सोप्या स्टेप्स असून त्याद्वारे तुम्ही घरी बसून सहज तपासणी करू शकता.
सर्वप्रथम पीएम किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा. तसेच मेन पेजवरील मेनू बारवर जा आणि ‘फार्मर कॉर्नर’ वर जा. येथे लाभार्थी सूचीवर क्लिक/टॅप करा. असे केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असे काही पेज उघडेल. येथे तुम्ही राज्यातील ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमचे राज्य निवडा. यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये जिल्हा, तिसऱ्यामध्ये तहसील किंवा उपजिल्हा, चौथ्या भागात ब्लॉक आणि पाचव्यामध्ये आपल्या गावाचे नाव निवडा.
यानंतर, Get Report वर क्लिक करताच, संपूर्ण गावाची यादी तुमच्यासमोर अशी असेल. व्हिलेज डॅशबोर्डच्या तळाशी चार बटणे सापडतील, तुम्हाला किती शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास, प्राप्त झालेल्या डेटावर क्लिक करा, जे प्रलंबित आहेत, दुसऱ्या बटणावर क्लिक करा, अशा तपासणी करता येते.