सोमवार, नोव्हेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र आहे तरी काय शेतकऱ्यांना त्याचा असा होणार फायदा

जुलै 27, 2023 | 5:15 am
in इतर
0
PMKSK

‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ ः शेतकऱ्यांसाठी वरदान

27 जुलैला प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी हे राजस्थान येथील सिकोर येथून देशभरातील १ लाख २५ हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांचा हा विशेष लेख.

Dr.Anil Bonde
डॉ.अनिल बोंडे, अमरावती (लेखक महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री असून विद्यमान राज्यसभा सदस्य आहेत)

भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या ‘अमृत काळात’ चहूबाजूंनी देश विकासाचा समृद्धपथ पादक्रांत करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कना असलेला देशातील शेतकरी सुद्धा या विकासयात्रेचा साक्षीदार असायला हवा, तो मुख्य प्रवाहात येऊन प्रवाही व्हायला हवा. सुजलाम, सुफलामतेच्या दिशेने शेतकऱ्यांनी प्रवास करावा याकरिता देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी हे आपल्या कर्तव्याशी प्रतिपद्धता जोपासत त्यांच्याकरिता कृषी क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करून देत आहेत. याच क्रमात शेतकऱ्यांची शेतीसाहित्य, कृषी निविष्ठा, नवनवीन तंत्रज्ञानावर आधारीत शेतीविषयक माहितीची आदान-प्रदान, त्यांच्या मालाची सुरक्षितता, पाश्चत्य देशात विकसीत होत असलेले अत्याधूनीक तंत्रज्ञान, शेतकरी जागृकता, मार्गदर्शन, दळवणवळनाच्या पुरेशा सोईसुविधा आदी बाबी लक्षात घेता त्यांची यासाठी, यापुढे गैरसोय होऊ नये म्हणून या संपूर्ण प्रश्नांवर एकाच ठिकाणावरून उत्तर मिळवता यावे, शेतकऱ्यांना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. जेथून शेतकऱ्यांना उपरोक्त सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यानुषंगाने 27 जुलै रोजी राजस्थान येथील सिकोर येथून देशभरात 1 लाख 25 हजार अशा ऐतिहासिक ‘पीएमकेएस’ केंद्रांचा शुभारंभ होत आहे. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नांना पूर्णपणे बळ देण्याचा प्रयत्न प्रधानमंत्र्यांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘किसान समृद्धी केंद्रावर’ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोई-सुविधांवर एक दृष्टीक्षेप. विशेष म्हणजे, भारतीय जतना पार्टीच्या किसान मोर्चा मार्फत देशातील शेतकऱ्यांपर्यंत या संपूर्ण सुविधा पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे जनजागृती सुद्धा केली जात आहे.

शेतीची पेरणी ते कापणी पर्यंत आवश्यक असणाऱ्या विविध बाबींची खरेदी अथवा त्या माहिती करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता या केंद्रांच्या माध्यमातून या संपूर्ण सुविधा शेतकऱ्यांना एकाच छताखालून उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न पहिल्यांदाच केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घेत त्याची देशभरात प्रभावी अंमलबजावणी सुद्धा होत आहे. गावं, तालुका, जिल्हा या ठिकाणी असलेल्या कृषी निवष्ठांच्या केंद्रांवर अथवा आवश्यकतेप्रमाणे नव्याने कृषी समृद्धी केंद्र स्थापन केले जाणार आहे. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण सुविधा एकाच ठिकाणांहून पुरविल्या जातील.

पीएमकेएस केंद्राच्या माध्यमातून विविध स्तरावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोई-सुविधा ह्या निश्चित करण्यात आल्या असून त्यामध्ये गावं पातळीवर आलेल्या साहित्याची योग्य त्या पद्धीतीत देखरेख व्हावी याकरिता रॅक, बसण्याची व्यवस्था, डिजीटल व्यवहारासाठी मशीन, क्यूआर कोड, बार कोड स्कॅनर, मालाची उपलब्ध, सबसिडी, किंमत दाखविणारे डिजीटल फलक, पीक साहित्य तक्ता, माती सुपीकता नकाशा, शासकीय विभागांकडून प्राप्त संदेशाचे प्रदर्शन, गावपातळीवरील सुविधांव्यतिरिक्त, तालुका, ब्लॉकच्या ठिकाणी इंटरनेट सुविधा, स्मार्ट टीव्ही, शेतकऱ्यांकरिता मदत कक्ष, सामायिक सेवा केंद्र, माती परीक्षण, बियाणे चाचणी नमुना संकलन, शेतीची अवजारे, ड्रोन इत्यादी तर जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या केंद्रांवर मोठ्याप्रमाणात सुविधांची उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये उपलब्ध कृषी निविष्ठा, श्रेणी दर्शविणारे मोठे प्रदर्शन क्षेत्र, प्रशस्त बैठक व्यवस्था, माती, बियाणे, पाणी आणि कीटकनाशके चाचणी सुविधा, स्मार्ट टिव्हीच्या माध्यमातून अत्याधूनीक कृषी पद्धती, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, नवीनवीन विकसीत तंत्रज्ञान, उत्पादने आणि त्यांचे वैज्ञानिक उपयोग यावरील चित्रफीत त्याठिकाणी दाखविल्या जाणार आहेत. यासह प्रादेशिक भाषांमधील कृषी तज्ञांना शेतकऱ्यांशी जोडण्यासाठी टेलि फर्टिलायझर प्रणालीसाठी देखील याचा वापर होणार आहे.

ग्राहक-शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देतानाच शक्य त्याठिकाणी एटीएम आणि सौर ऊर्जा पॅनेल सुद्धा लावले जाणार आहे. तसेच या केंद्रांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या दर्जेदार खतांची विक्री त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फेटिक, पोटॅसिक खते, दुय्यम आणि सूक्ष्म पोषक, पाण्यात विरघळणारी खते, पर्यायी, जैव आणि सेंद्रिय इत्यादींचा समावेश आहे. तसेच खतांच्या एकूण विक्रीमध्ये 20 टक्के सवलतीची सुविधा देखील दिला जाणार आहे. कृषी निविष्ठा, कीटकनाशके, बियाणे आणि लहान शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे फवारणीसाठी ड्रोनसह शेती उपकरणे घेण्यासाठी मदत करणे, राज्य कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या, चांगल्या कृषी पद्धतीप्रमाणे विविध पिकांची लागवड करण्यास मदत करणे, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती, शेतकऱ्यांसाठी हेल्प डेस्क, कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे मदत, माती परीक्षणावर आधारित मातीचे विश्लेषण, पोषक तत्वांचा वापर, एकात्मिक आणि संतुलित वापरास प्रोत्साहन, विविध पिकांच्या लागवड पद्धतींचा अवलंब, शेतमालाची माहिती, हवामानाचा अंदाज, किरकोळ विक्रेत्यांची क्षमता वाढवणे त्याकरिता त्यांचे दर सहा महिन्यांनी प्रशिक्षण घेणे, इत्यादी सोई-सुविधा या केद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणार असल्याने शेतकऱ्यांसाठी देशभऱात ही केंद्र वरदान ठरत आहेत.

महाराष्ट्रामध्ये 14 हजार 780 तर अमरावती जिल्ह्यांमध्ये (27, जुलै) 600 पेक्षा अधीक प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रांचे लोकार्पण होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या नेतृत्वात विविध विभागाच्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. आझादीचा अमृत महोत्सवात जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे ऐतिहासिक पाऊलं उचल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व अभिनंदन करत आहे.

· तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार
पीएमकेएसकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करून “किसान-की-बात” या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे संपूर्ण विचार मांडण्याची मुभा असेल. जवळच्या पीएमकेएस मार्फत अशा बैठका दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी घेतल्या जातील. त्याची दिनदर्शिका सुद्धा प्रकाशित केली जाईल. कृषी शास्त्रज्ञ, विशेषज्ञ, सेवानिवृत्त कृषी तज्ज्ञ आदींची मार्गदर्शन सुद्धा शेतकरी, पीएमकेएसकेचे व्यापारी यांना उपलब्ध होणार आहे. तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांचा किसान समृद्धी नावाने सोशल माध्यमांवर समूह तयार करून त्या समुहाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अद्यावत माहिती शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहे.

· ‘पीएमकेएस’ केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये
एकाच छताखाली वाजवी किंमतीमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके आदी दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देणे. मृदा, बियाणे, खते, चाचणी सुविधा, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानधीष्ठीत व परिपूर्ण सुविधा केंद्रांशी संलग्नित करणे. लहान आणि मोठ्या शेती अवजारांची उपलब्धता अथवा कस्टम हायरिंग सेंटर्स, चांगल्या कृषी पद्धतीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृकता निर्माण करणे, शेतकऱ्यांशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती देणे इत्यादी वैशिष्टांसह परिपूर्ण असलेल्या ‘पीएमकेएस’ केंद्रांसोबत लहान शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांना आवश्यतेप्रमाणे मदतही केली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यांमध्ये आज (27 जुलै) सुमारे 600 पेक्षा अधीक या केंद्रांचे लोकार्पण केले जाणार आहे.

· अशी करा केंद्राची निर्मिती
गांव, मंडळ, तालुका, जिल्हा पातळीवर 2.8 लक्ष क्षमता असलेल्या किरकोळ कृषी निविष्ठांच्या केंद्रांचे ‘पीएमकेएस’मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून रुपांतरण करता येऊ शकते, त्याचे टप्याटप्याने काम सुद्धा हाती घेण्यात आले आहे. अथवा नवीन केंद्र निर्मितीही करता येईल. त्यानंतर प्रत्येक पीएमकेएस केंद्रामध्ये दर्शनीय भागावर ग्लो साइन बोर्ड, फ्लेक्स साइन बोर्ड असावा. देशभरातील त्या-त्या प्रदेशातील शेतकऱ्यांच्या प्रतिमा, भाषा व संदेश इत्यादी बाबी वगळल्यास संपूर्ण कार्यपद्धती ही एकसमान असणार आहे. विक्रेत्याच्या दुकानाचे नाव, पत्ता आणि जीएसटी क्रमांक इत्यादी ठळकपणे नोंदवावी, त्यासाठी संपूर्ण नियमानूसार प्रक्रिया पुर्ण करवी लागेल. सध्यास्थितीमध्ये 1 लाखाहून अधिक कृषी निविष्ठा केंद्रांचे ‘पीएमकेएसकेएस’ मध्ये रूपांतर करण्यात आले असून 1.8 लाख दुकाने 2023 च्या अखेरीस रूपांतरित करण्याचे नियोजन केंद्र सरकारमार्फत करण्यात आले आहे.

(लेखक महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री असून विद्यमान राज्यसभा सदस्य आहेत)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रातील ८५ लाख शेतकऱ्यांना मिळणार थोड्याच वेळात गुडन्यूज

Next Post

शिक्षणसंस्थांना मालमत्ता कर माफ होणार का? सरकारने विधिमंडळात दिली ही माहिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
vidhan parishad

शिक्षणसंस्थांना मालमत्ता कर माफ होणार का? सरकारने विधिमंडळात दिली ही माहिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011