नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संपूर्ण देशाला अभिमानास्पद कामगिरी करणारे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. उभयतांच्या या भेटीदरम्यान शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातील आपले अनुभव, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताची प्रगती आणि देशाचा महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रम – गगनयान यासह विविध विषयांवर चर्चा केली.
समाज माध्यम ‘एक्स’वर पंतप्रधान मोदी यांनी लिहिले शुभांशू शुक्ला यांच्याशी खूप छान संवाद झाला. त्यांचे अंतराळातील अनुभव, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती तसेच भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसह विविध विषयांवर आमची चर्चा झाली. शुभांशू शुक्ला यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे.