नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- संवत्सरीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून क्षमा, करुणा आणि प्रामाणिक मानवी संबंध या कालातीत मूल्यांवर भर दिला आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “संवत्सरी ही क्षमाशीलतेच्या सौंदर्याची आणि करुणेच्या शक्तीची आठवण करून देते. ती लोकांना प्रामाणिकपणे बंध जोपासण्याची प्रेरणा देते. या पवित्र प्रसंगाचे औचित्य साधत असताना आपले हृदय नम्रतेने भरून जावो आणि आपल्या कृतींमध्ये दयाळूपणा तसेच सद्भावना प्रतिबिंबित होवो. मिच्छामी दुक्कडम!”