सोमवार, सप्टेंबर 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी…जाणून घ्या, नेमकी काय आहे योजना

by Gautam Sancheti
जुलै 17, 2025 | 6:57 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
modi 111

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला सहा वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली. या योजनेचा प्रारंभ २०२५-२६ पासून १०० जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक/संलग्न क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी पहिलीच योजना आहे.

कृषी उत्पादकतेत वाढ करणे, पीक वैविध्य आणणे, शाश्वत कृषी पद्धतींचा वापर करणे, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर काढणीनंतर साठवण क्षमतेत वाढ, सिंचन सुविधा सुधारणे तसेच दीर्घकालीन आणि अल्प मुदतीची कर्जे सहजपणे उपलब्ध करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. या योजनेअंतर्गत 100 जिल्हे विकसित करण्याची तरतूद २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही योजना ११ विभागांमधील ३६ विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासह स्थानिक भागीदारीद्वारे राबविली जाईल.

कमी उत्पादकता, पीक घेण्याची वारंवारता कमी असणे आणि कमी कर्ज वितरण या तीन प्रमुख निर्देशकांप्रमाणे १०० जिल्हे योजना अंमलबजावणीसाठी निवडले जाणार आहेत. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या लागवडीखालचे एकूण क्षेत्र आणि ऑपरेशनल लँड होल्डिंग (शेतीसाठीची भूधारकता) यांच्या प्रमाणावर ठरेल मात्र प्रत्येक राज्यातून किमान एक जिल्हा निवडला जाईल.

या योजनेचे प्रभावी नियोजन, तिची अंमलबजावणी आणि त्यावर देखरेखीसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर समित्या स्थापन केल्या जातील. जिल्हा धन धान्य समितीकडून जिल्हा कृषी आणि संलग्न उपक्रम योजनेला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. प्रगतीशील शेतकरीदेखील या समित्यांचे सदस्य असतील. पीक विविधता, पाणी आणि मृद आरोग्याचे संवर्धन, शेती आणि संलग्न क्षेत्रातील स्वयंपूर्णता तसेच नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीचा विस्तार या राष्ट्रीय उद्दिष्टांच्या धर्तीवर जिल्हा योजना आखल्या जाणार आहेत. प्रत्येक धन धान्य जिल्ह्यात कामगिरी विषयीच्या ११७ प्रमुख निकषांनुसार योजनेच्या प्रगतीचे निरीक्षण दरमहा केले जाईल. जिल्हा योजनांचा आढावा घेऊन नीती आयोग मार्गदर्शनही करेल. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले केंद्रीय नोडल अधिकारी नियमितपणे योजनेचा आढावा घेतील.

या १०० जिल्ह्यांमधील निर्धारित फलनिष्पत्तीत सुधारणा झाली तर प्रमुख कामगिरी निर्देशकांच्या तुलनेत देशाच्या एकूण सरासरीत वाढ होईल. या योजनेमुळे उत्पादकता वाढेल, शेती आणि संबंधित क्षेत्रात मूल्यवर्धन होईल, स्थानिक पातळीवर उपजीविकेची साधने निर्माण होईल. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि आत्मनिर्भर भारत हे लक्ष्य साध्य होईल. या १०० जिल्ह्यांच्या निर्देशकात सुधारणा होत असताना, राष्ट्रीय निर्देशक आपोआपच सुधारतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी कामामध्ये आळसपणा करू नये, जाणून घ्या, गुरुवार, १७ जुलैचे राशिभविष्य

Next Post

उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे पहिल्यांदा एकाच फ्रेममध्ये….हे होतं निमित्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार…महामार्गावरील घटना

सप्टेंबर 29, 2025
crime 71
क्राईम डायरी

धक्कादायक….दोन भिका-यांमध्ये झालेल्या वादात एकाचा चाकूने भोसकून खून…नाशिकची घटना

सप्टेंबर 29, 2025
संघगीतांमध्ये प्रेरणेच्या भावनेसह भविष्याला दिशा देण्याचे सामर्थ्य
महत्त्वाच्या बातम्या

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शंकर महादेवन यांनी गायलेल्या संघगीतांचे लोकार्पण

सप्टेंबर 29, 2025
IMG 20250928 WA0555 1
संमिश्र वार्ता

मंत्री छगन भुजबळ यांनी पाण्यात उतरून पूरग्रस्त भागाची केली पाहणी

सप्टेंबर 29, 2025
Screenshot 20250929 071049 WhatsApp
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन दाखल,पंचवटी परिसरात गोदावरी पूर परिस्थितीचा घेतला आढावा

सप्टेंबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वादग्रस्त मुद्दे टाळावे, जाणून घ्या, सोमवार, २९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 29, 2025
Untitled 46
मुख्य बातमी

भारताने आशिया कप जिंकला…अंतिम चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानचा केला पराभव

सप्टेंबर 29, 2025
Untitled 45
महत्त्वाच्या बातम्या

भारत – पाकिस्तानमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवणार नाही…ठाकरे गटाच्या विरोधानंतर पीव्हीआरचा निर्णय

सप्टेंबर 28, 2025
Next Post
Gv ZxS WUAAdhRw

उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे पहिल्यांदा एकाच फ्रेममध्ये….हे होतं निमित्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011