नवी दिल्ली – सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री केअर निधीतून, ५५१ पि एस ए वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारायला निधी पुरवण्यासाठी, सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये हे प्रकल्प उभारले जातील. राज्यात, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर यासह एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प असतील. हे सर्व प्रकल्प तातडीनं कार्यान्वित करावेत असे निर्देशही प्रधानमंत्र्यांनी दिले होते.