विशेष प्रतिनिधी, मुंबई/नाशिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राज्यातील नाशिक महापालिकेला कनेक्टरशिवाय व्हेंटिलेटर पाठवले, असा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. अशा व्हेंटिलेटरची छायाचित्रे सर्वत्र शेअर करण्यात आली आहेत.
कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने पीएमकेअरफंडांमार्फत १० दिवसांपूर्वी काही व्हेंटिलेटर नाशिक महानगरपालिकेत पाठविले, पण त्यांना कनेक्टरच नाही.
जेव्हा व्हेंटिलेटरची तीव्र गरज असते, तेव्हा आपण अशा अपुऱ्या साधनांच्या वापराची कशी अपेक्षा करू शकतो? कारण याचा रुग्णांना काहीही उपयोग होणार नाही.
केंद्र सरकारवर जोरदार टीका करीत सांवत म्हणाले की, मोदी सरकारच्या अशा उत्तम वाटणाऱ्या पण बेगडी योजना आणि व्यवस्थापनाचे कौतुक करावे की निषेध करावा. कोविड -१९ च्या वाढत्या घटनांमुळे रुग्णांना श्वास घेताना त्रास होतो म्हणून देशभरातील अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. पण तोही केंद्राकडून पुरेसा मिळत नाही.
सावंत यांनी केलेल्या ट्विटमुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मोदी सरकारने जर काही चुकीचे केले असेल तर राज्य सरकारने ते सुधारण्याची गरज आहे. चुकून हे घडण्याची शक्यता आहे. तसेच राजकारणाची ही वेळ नाही,” असे ट्विटर यूजर्स अशोक नारायण बट्टुल यांनी म्हटले आहे. तर, दुसर्या ट्विटर वापरकर्त्याने सांगितले की, व्हेंटिलेटरचे कनेक्टर नसणे ही सामान्य बाब नाही आणि केंद्र सरकारने त्याच कंपनीकडून खरेदी तेव्हा करणे आवश्यक आहे.