नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मे 2021 रोजी बालकांसाठी पीएम केअर्स योजना जाहीर केली. 11 मार्च 2020 ला सुरू झालेल्या कोविड महामारी कालावधीत दोन्ही जन्मदाते वा कायदेशीर पालक वा दत्तक पालक किंवा एकमेव असलेला पालक गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी ही योजना आहे. बालकांसाठी कायमस्वरूपी सर्वंकष आधार व संरक्षण यांची हमी देत आरोग्य विम्याच्या माध्यमातून त्यांचे कल्याण साधत , शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करत 23 वर्षे वय गाठताना त्यांना स्वावलंबी आणि आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. केंद्रीय स्तरावर ही योजना महिला व बालकल्याण मंत्रालय या मध्यस्थ मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जाईल, तर राज्ये वा केंद्रशासित प्रदेशात अल्पवयीन न्यायदानाच्या बाबींशी संलग्न विभाग हा या योजनेचा राज्यस्तरावरील मध्यस्थ असेल. ही योजना राबवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा दंडाधिकारी हे सक्षम मध्यस्थ अधिकारी असतील. ऑनलाईन पोर्टल https://pmcaresforchildren.in येथे या योजनेची माहिती मिळेल. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना 15.07.2021 रोजी या योजनेची माहिती दिली गेली आहे आणि यासाठी पात्र बालकांचा शोध घेऊन त्यांची पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेसाठी पात्र बालकांबद्दल कोणताही नागरीक प्रशासनाला या पोर्टलच्या माध्यमातून कळवू शकतो.
केंद्रीय स्तरावर ही योजना महिला व बालकल्याण मंत्रालय या मध्यस्थ मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जाईल, तर राज्ये वा केंद्रशासित प्रदेशात अल्पवयीन न्यायदानाच्या बाबींशी संलग्न विभाग हा या योजनेचा राज्यस्तरावरील मध्यस्थ असेल. ही योजना राबवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा दंडाधिकारी हे सक्षम मध्यस्थ अधिकारी असतील.