नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद’ या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत प्रोत्साहन प्राप्त महिला स्वयं सहाय्यता गट,सामुदायिक विशेषज्ञ व्यक्ती यांच्याशी दुपारी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. देशभरातल्या महिला स्वयंसहाय्यता गट सदस्यांच्या यशोगाथा त्याचबरोबर कृषी उपजीविका सार्वत्रीकरण यावरच्या एका पुस्तीकेचेही प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
४ लाखाहून अधिक स्वयं सहाय्यता गटांना १६२५ कोटी रुपयांचा भांडवली सहाय्य निधीही पंतप्रधानांनी जाहीर केले. याशिवाय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या, पीएम सूक्ष्म अन्न प्रक्रिया आस्थापना औपचारीकीकरण योजने अंतर्गत ७५०० स्वयं सहाय्यता गट सदस्यांना बीज रक्कम म्हणून २५ कोटी रुपये, अभियानांतर्गत प्रोत्साहन देण्यात येणाऱ्या ७५ एफपीओ म्हणजेच कृषी प्रक्रिया संस्थांसाठी ४.१३ कोटी निधीही यावेळी जाहीर करण्यात आले.
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस, ग्रामीण विकास राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती, फग्गन सिंह कुलस्ते, पंचायती राज राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटील आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, यावेळी उपस्थित होते.
https://twitter.com/narendramodi/status/1425717538416066568?s=20