इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचा-यांच्या ८ व्या वेतन आयोगाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ व्या वेतन आयोगास मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिली.
१८४७ पासून आतापर्यंत ७ वेतना आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. आता ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. २०१६ साली यापूर्वीचा ७ वा वेतन आयोग मंजूर झाला होता. त्यानुसार २०२६ मध्ये ८ वा वेतन आयोग लागून होईल. २०२५ मध्ये ८ वा वेतन आयोग स्थापन केल्यास संपूर्ण प्रक्रियेसाठी १ वर्षाचा कालावधी मिळतो असे आश्विनी वैष्णव यांनी सांगितले.