नवी दिल्ली – आयुर्वेद आणि योग क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. जगात, विशेषकरून युवा वर्गात आयुर्वेद लोकप्रिय करण्यासाठीचे डॉ बालाजी तांबे यांचे प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. कनवाळू स्वभावाचे डॉ बालाजी तांबे यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे प्रशंसक आणि कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1425298549093240832?s=20