इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विश्वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताची मान गौरवाने उंचावल्याबद्दल कोनेरू हंपी हिचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी तिची कुशाग्र बुद्धी आणि अविचल निश्चय स्पष्टपणे दिसून येत होते असे नमूद केले .
‘एक्स’ वरील कोनेरू हम्पीच्या पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:“कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. ती एक क्रीडाजगतातील ‘आयकॉन’ आहे आणि महत्वाकांक्षी खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत आहे. तिची कुशाग्र बुद्धी आणि अविचल जिद्द स्पष्टपणे दिसून येते. तिने भारताची मान केवळ अभिमानाने उंचावली नाही नाही तर उत्कृष्टता म्हणजे काय असते, याची नव्याने व्याख्या केली आहे.