इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रामायण आणि महाभारताचे अरबी भाषेत भाषांतर करून, हे भाषांतरीत साहित्य प्रकाशित करण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अल – बरौन आणि अब्दुल लतीफ अल – नसेफ यांची प्रशंसा केली आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :’रामायण आणि महाभारताचे अरबी भाषांतर पाहून आनंद झाला. अब्दुल्ला अल बरौन आणि अब्दुल लतीफ अल नसेफ यांनी याचे भाषांतर आणि प्रकाशन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो. त्यांचा हा उपक्रम जागतिक पटलावर भारतीय संस्कृतीची लोकप्रियता अधोरेखित करतो.
https://twitter.com/IamPolSol/status/1870448512128962730