नवी दिल्ली – पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू व स्मरणचिन्हे यांचा ई-लिलाव सांस्कृतिक मंत्रालयाकडून १७ सप्टेंबर पासून आयोजित केला आहे. लिलावातून जमा झालेली रक्कम नमामि गंगे योजनेला दिली जाणार आहे. या लिलावात स्मरणचिन्हांमध्ये ऑलिंपिक तसेच परालिम्पिक विजेत्यांचे क्रीडा साहित्य आणि उपकरणे तसेच अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती यांचा समावेश आहे. व्यक्ती किंवा संस्था 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत : https://pmmementos.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून लिलावात भाग घेऊ शकतील. या लिलावात चारधाम, रुद्रकेश सामुदायिक केंद्र यांच्या प्रतिकृती, शिल्प, चित्र आणि मानाच्या शाली यांचाही समावेश आहे. या लिलावातून जमा झालेली रक्कम नमामि गंगे योजना या गंगा नदीचे संरक्षण आणि पुनरूज्जीवन हे लक्ष्य असलेल्या ‘नमामि गंगे’ या योजनेसाठी दिली जाईल.