नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली आहे. ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले, ज्यांनी नेहमीच तरुणांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास करण्यात, त्यांना घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, अशा सर्व शिक्षक बांधवांना, शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा. कोविड – 19 च्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास ज्या पद्धतीने चालू ठेवला आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि त्यांची विद्वत्ता आणि देशाप्रति त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करतो.
On Teachers' Day, greetings to the entire teaching fraternity, which has always played a pivotal role in nurturing young minds. It is commendable how teachers have innovated and ensured the education journey of students continues in the COVID-19 times.
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2021