नवी दिल्ली – भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या, या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी लतादीदींचे आभार मानले आहेत. लतादीदींनी पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे ट्विट करत त्यासोबत एक गुजराती भजन जोडले होते. आशीर्वादासाठी आपले खूप खूप आभार लतादीदी ! आपल्यालाही जन्माष्टमीच्या अनेक शुभेच्छा ! आपल्या सूरांनी सजलेलं हे भजन मंत्रमुग्ध करणारं आहे. असं ट्विट पंतप्रधानांनी उत्तरादाखल केले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1432373212961247239?s=20