नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सिंह संवर्धनाबद्दल झपाटून काम करत असलेल्या सर्वांना जागतिक सिंह दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सिंह दिमाखदार, भव्यदिव्य आणि धैर्यवान आहे. भारताला आशियाई सिंहाचे माहेरघर असल्याचा अभिमान आहे. जागतिक सिंह दिनानिमित्त, मी सिंह संवर्धनाबद्दल झपाटून काम करत असलेल्या सर्वांना शुभेच्छा देतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील सिंहाची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याचे जाणून तुम्हाला आनंद होईल. मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो, तेव्हा मला गीर सिंहांना सुरक्षित अधिवास मिळावा यासाठी काम करण्याची संधी मिळाली. यादृष्टीने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. स्थानिकांना यात सहभागी करुन घेतले. सर्वोत्तम जागतिक पद्धतींचा उपयोग केला. जेणेकरुन सिंहांची निवासस्थाने सुरक्षितही राहतील आणि पर्यटनालाही चालनाही मिळेल. असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेश मालिकेत म्हटले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1424930989202046982?s=20
https://twitter.com/narendramodi/status/1424931456132947970?s=20