विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोविड रुग्ण गंभीर झाल्यावर मृत्यूची शक्यता कमी करण्यासाठी अवलंबिली जाणारी प्लझ्मा थेरपी प्रभावी नसल्याचे दिसून आले आहे. कोविडच्या वैद्यकीय व्यवस्थापन दिशानिर्देशातून प्लाझ्मा थेरपीला हटविले जाण्याची शक्यता आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी कोविड झालेल्या ज्येष्ठ रुग्णांच्या उपचाराबाबतच्या वैद्यकीय दिशानिर्देशातून प्लाझ्मा थेरपी हटविली जावी, अशी मागणी केली. ही पद्धत प्रभावी नसल्याने तसेच त्याचा दुरुपयोग होत असल्याने त्यावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली.
आयसीएमआर लवकरच याप्रकरणी आपले मत जाहीर करणार आहे. सध्याच्या दिशानिर्देशानुसार, लक्षणे आढळल्यानंतर सात दिवसात आजाराच्या मध्यम स्तरालावर आणि गरज पूर्ण करणार्या प्लाझ्मादाता उपलब्ध असल्यास प्लाझ्मा देण्यास परवानगी देण्यात आली होती. देशात कोविड उपचारात प्लाझ्मा पद्धतीचा अवैज्ञानिक वापर होत असल्याबद्दल डॉक्टर आणि वैज्ञानिकांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांना काही डॉक्टरांनी पत्र लिहून प्लाझ्मा पद्धतीला दिशानिर्देशातून हटविण्याची मागणी केली होती. हे पत्र आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही पाठविण्यात आले आहे.