मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ही होणार जगातील पहिली बिटकॉइन सिटी; हालचाली जोरात सुरू

by India Darpan
नोव्हेंबर 24, 2021 | 5:28 am
in संमिश्र वार्ता
0
bitcone

मुंबई – ऑनलाईन पेमेंटची पद्धत रूढ होत असतानाच जगभरात क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. भारतातील देखील क्रिप्टोकरन्सीबद्दल विचारमंथन सुरू आहे. वास्तविक क्रिप्टोकरन्सीबाबत रिझर्व्ह बँकेने अनेक गंभीर चिंता व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर सरकारकडूनही याबाबत अनेक प्रकारच्या चिंता व्यक्त केल्या जाऊ शकतात. सरकार क्रिप्टोकरन्सी मधून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत आणण्याच्या विचारात आहे. त्यासाठी आयकर कायद्यात बदल करण्याचा विचार केला जात आहे. यातील काही बदल पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाचा भाग असू शकतात.

अनेक देशांमध्ये बिटकॉइन विषयी अधिक आकर्षण वाढत आहे. मध्य अमेरिकेतील एल साल्वाडोर हा छोटासा देश आता जगातील पहिले बिटकॉइन शहर बनवण्याच्या तयारीत आहे. एल साल्वाडोरचे राष्ट्रपती बुकेले यांनी त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक वाढवण्यासाठी क्रिप्टोकरन्सीवर मोठा बोली लावण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रपती बुकेले म्हणाले की, या शहराला बिटकॉइन बाँडद्वारे निधी दिला जाईल. आम्ही २०२२ मध्ये निधी देणे सुरू करू, त्यानंतर बाँड उपलब्ध होतील. एल साल्व्हाडोर प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान देश आहे. साल्व्हाडोरच्या पश्चिमेला होन्डुरास, उत्तर व पूर्वेला ग्वातेमाला तर दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. सान साल्व्हाडोर ही एल साल्व्हाडोरची राजधानी व सर्वात मोठे शहर आहेत.

अलीकडेच एल साल्वाडोर बिटकॉइनला अधिकृत चलन म्हणून मान्यता देणारा पहिला देश बनला आहे. बुकेले पुढे म्हणाले की, मूल्यवर्धित कर (व्हॅट) वगळता कोणताही कर आकारला जाणार नाही. बुकेले यांच्या सरकारने दावा केला होता की या निर्णयामुळे अनेक देशवासीयांना प्रथमच बँक सेवांचा लाभ मिळेल. त्याचबरोबर रेमिटन्स फंडावरही मोठी बचत होणार आहे. तसेच बुकेले यांनी आपल्या भाषणात गुंतवणूकदारांना येथे गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवण्यास सांगितले. बिटकॉइनवर आधारित बाँडद्वारे शहराला निधी दिला जाईल.

एल साल्वाडोर हा जगातील पहिला देश आहे जिथे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनला कायदेशीर निविदा घोषित करण्यात आली. राष्ट्रपतींच्या मते, बिटकॉइन सिटी परिपत्रकात विमानतळ, निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र, सेंट्रल प्लाझा असेल. हे शहर अशा प्रकारे बांधण्यात येणार आहे की, जेव्हा तुम्ही ते हवेतून पाहाल तेव्हा बिटकॉइनचे चिन्ह दिसेल. तसेच कराची निम्मी रक्कम शहरावर खर्च होणार आहे. तसेच सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी सुमारे ३ लाख बिटकॉइन्स खर्च होतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आमिर खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? हिच्या नावाची आहे चर्चा…

Next Post

ओझर विमानतळावरुन या कंपन्यांची सुरू आहे विमानसेवा (वेळापत्रक)

India Darpan

Next Post
nashki airport

ओझर विमानतळावरुन या कंपन्यांची सुरू आहे विमानसेवा (वेळापत्रक)

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011