पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हवेली तालुक्यातील मोशी येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील ४ विद्यार्थीनींनी पिझ्झा खाल्ला म्हणून त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असून, वसतिगृहाच्या गृहप्रमुखान मार्फत प्रशासकीय बाब म्हणून संबंधित विद्यार्थीनींना फक्त समज देण्यात आली होती.
प्रत्यक्षात कोणत्याही विद्यार्थीनींना वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेले नाही, ही वस्तू स्थिती आहे. वसतिगृहातून विद्यार्थिनींना काढून टाकल्याचे वृत्त चुकीचे आहे. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.