आपली रास मीन आहे का?
२०२३ असं जाईल जाणून घ्या
वाचकांच्या आग्रहास्तव सर्व बारा राशींच्या व्यक्तींना नवे वर्ष कसे जाणार याबाबतचा रोज एका राशीचा अंदाज दहा टिप्सच्या स्वरूपात आपण बघत आहोत. आज आपण मीन राशी विषयी माहिती घेणार आहोत. दि, दु, ठ, थ, झ, यां, दे, दो, चा,ची ही अद्याक्षरे असलेल्या नावाच्या व्यक्तींची रास मीन असते. ही बृहस्पतिची दुसरी आणि शेवटची राशी आहे. या राशीच्या लोकांमध्ये सहानुभूतीची भावना असते, जरी ते स्वतःला वाढवून मदत करत नसले तरी जेव्हा बोलावले जाते तेव्हा ते पूर्णपणे मदत करण्यास तयार असतात. ते तत्वज्ञानी आहेत, रोमँटिक जीवन जगतात, धैर्याने बोलतात आणि विचारशील असतात. त्यांच्या नम्रतेमुळे जीवनातील यशाच्या अनेक संधी नष्ट होतात. तर, चला वेळ न दवडता आपण या मीन राशीला नवे वर्ष कसे असेल हे जाणून घेऊया..
मीन रास
१) मीन राशीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी यावर्षी त्यांना हव्या त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी मागील वर्षी पेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे…
२) भागीदारी तसेच व्यवसाय करणाऱ्यांनी यावर्षी अधिक भांडवल लावण्याची तयारी ठेवावी…
३) विवाह इच्छुकांना त्यांच्या स्वप्नातला जोडीदार मिळेल. लग्नानंतर मात्र खर्चावर नियंत्रण असावे..
४) आर्थिक व्यवहाराबाबत सुरक्षित गुंतवणूक असावी…
५) ऍसिडिटी तसेच वाताचे दुखणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही..
६) कौटुंबिक कुरबुरी तसेच अन्य वाद जास्त वाढणार नाहीत, असे बघावे..
७) महत्त्वाची कागदपत्रे ऐनवेळी गाळ होणार नाहीत, याची काळजी घ्यावी…
८) कोर्ट कचेरीच्या कामात तडजोड स्वीकारावी….
९) महिला वर्ग तसेच मुली यांना भरपूर ठिकाणी शॉपिंगची हाऊस पुरवता येणार आहे..
१०) नवीन वाहन खरेदी भरपूर प्रवास याचीही इच्छा पूर्ण होणार आहे..
टीप – वरील टिप्स या मीन राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. मेष राशीत असलेली रेवती, उत्तरा भाद्रपदा, पूर्वा भाद्रपदा या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तु व्हिजिट कॉम्प्युटर कुंडली शुभनवरत्न व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन भवानी ज्योतिष.. पं. दिनेशपंत ..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84….
सर्व राशीच्या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा