श्राद्ध आणि सोपस्कार!…
पितृपक्षात वृद्धाश्रमात करा दान!…
पितृपक्षात वृद्धाश्रमात करा दान!…
गणपती विसर्जन झाले की प्रतिपदेपासून पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध सुरू होतात आणि ज्या तिथीला आपली व्यक्ती गेली आहे त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध करतात. माझ्या आईचे श्राद्ध द्वितीयेला तर तर चतुर्थीला वडिलांचे असते. दर वर्षी मी आणि शिबानी या तिथींना सकाळी अंघोळ करून मंदिरात केळी, अर्धा लिटर दूध घेऊन जातो. तिथे देवासमोर बसलेल्या गुरुजींना दूध, केळी आणि दक्षिणा देऊन राहिलेली केळी ही मंदिरा समोरील गरीब लोकांना वाटत असतो. पण करोनामुळे देवळे बंद असल्यामुळे देवा समोर दूध केळी ठेऊन गुरुजींना दक्षिणा देणे जमले नाही त्यामुळे मनात रूख रुख होती.
द्वितीयेला काही करता आले नाही त्यामुळे संध्याकाळी शिबानी कडे खंत व्यक्त केली तेव्हा तिने सांगितले की तिची एक फेसबुक मैत्रीण आहे ती वृध्दाश्रम चालवते आपण तिथे दान देऊन येऊ कारण सकाळी मंदिरात दूध केळी आणि नंतर वृद्धाश्रमात कीवा बालक आश्रमात यथा शक्ती दान करतो.
शिबानी ची कल्पना छान वाटली आणि काल चतुर्थी चे सकाळी सदर वृद्धाश्रमात गुगल वरून फोन नंबर काढून सुहास गोडसे (7083839266) यांचेशी संपर्क केला. त्यांचेशी बोलताना खूप आनंद वाटला आणि ते अगदी मनापासून हा वृध्दाश्रम चालवत आहेत याची खात्री पटली. त्याना आम्ही आज आश्रमात येणार आहोत आणि आम्हाला काही गोष्टी द्यायच्या आहेत तेव्हा आपणास काय हवे असे विचारले असता त्यांनी २० उशा आणि त्यांना कव्हर आणले तर बरे होईल असे सुचवले.
तात्काळ मी आणि शिबानी ने पासोड्या विठोबा जवळील होलसेल दुकानात जाऊन २० उशा आणि त्याला कव्हर आणले. माझ्या मुलीस क्षितिजाला फोन करून सांगितले असता तिने तीच्यातरफे बिस्किटे देणें साठी सांगितले. चिंचवड येथील बिजली नगर मधील मातृसेवा वृध्दाश्रम मधे साधारण ५.३० चे सुमारास पोहोचलो.
तिथे श्री सुहास गोडसे तसेच त्यांची कन्या संस्कृती गोडसे यांनी आमचे स्वागत केले. संस्कृती ही खरोखरच सुसंस्कृत मुलगी आहे आणि तिने नर्सींग चे कोर्स केले आहेत आणि सह्याद्री हॉस्पिटल मधील काम सोडून तिने स्वतःला आता वडिलांचे बरोबरीने या मातृसेवा वृद्धाश्रमात जुंपून घेतले आहे.
इथे साधारण ३०% लोकांना विना मोबदला तर ७०% लोकांना काही प्रमाणात शुल्क आकारून ठेवले जाते. सर्व वृध्द हे खूपच वयस्कर आहेत साधारण १३ लोक आहेत त्यात पुरुष आणि स्त्री आहेत. तेथील वृद्ध महिलांशी तसेच पुरुषांशी बोललो असता सर्व जण तोंड भरून संस्कृती आणि तिच्या वडिलांचे कौतुक करत होते. रोज नवीन नवीन पदार्थ जेवणास तसेच नाष्टा करणेस दिले जातात, वेळेवर औषधं दिले जाते. तिथे भरपूर स्वच्छता आढळली. घरातील सर्व जण जीव लावून काम करतात हेही दिसले.
या आश्रमांत खाली तीन खोल्या आहेत आणि वर गोडसे कुटुंब स्वतः राहतात. वृध्द पुरुष, स्त्रिया आणि मति मंद रुग्ण यांची सेवा सुश्रुषा केली जाते. यांना कोणतीही सरकारी मदत मिळत नाही आणि त्यांचे भाड्यात भरपूर पैसे जातात असे दिसले. घरातील सर्वजण स्वतः खपतात तरीही तीन लोकांना कामावर ठेवले आहे. सदर आश्रमात लोक खूप आनंदी वाटले. पण समाजाने या आश्रमास आर्थिक मदत केली पाहिजे कारण कोणतेही शासकीय अनुदान यांना मिळत नाही.
सर्वांनी या पितृ पंधरवड्यात फुल ना फुलाची पाकळी या आश्रमात देऊन आपल्या मातृ पितृ ऋणातून मुक्त व्हावे आणि या गरजू लोकांना मदत करावी. ही मदत नक्कीच सत्कारणी लागेल.
– विजय सागर (अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगर)