अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पिंपळनेर येथे सोयाबीनची चोरी करणारी सराईत टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी रंजीत योहान देसाई यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने तिघा साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे कुबूल केले. पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून ६५ क्विंटल सोयाबीन व ५ क्विंटल वरई (भगर) असा एकुण चार लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सोयाबीन चोरी करणा-या रॅकेट उघडीस आणले आहे. धान्य व्यापारी विजय देविदास पेंढारकर यांच्या भाईंदर गावच्या शिवारात धान्य ठेवण्याच पत्र्याच गोडाऊन मध्ये उघड्यावर ठेवलेला एक लाख ६२ हजाराचा २७ क्विंटल सोयाबीन व ३० हजार रुपयांची पाच क्विंटल वरई (भगर) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. या चोरीची तक्रार त्यांनी दाखल केल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत गुप्त माहिती मिळताच ही कारवाई केली. धुळ्याचे पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे.