पिंपळनेर – खासदार .सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त लाटिपाडा धरणावर वृक्षारोपण २ जुलै रोजी करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादासो.जयेश साळुंके व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस साक्री तालुका अध्यक्ष गितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे धुळे जिल्हा सोशल मीडिया समन्वयक आदेश साळुंके , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका सरचिटणीस राहुल जिरे , प्रियांशु भदाणे , अनिकेत नेरकर व पदाधिकारी उपस्थित होते.