पिंपळनेर – साक्री पंचायत समिती पोटनिवडणुकीत पिंपळनेर गणातून तिरंगी लढत दिसून येत होती या तिरंगी लढतीत भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र पाटील प्रचंड मतांनी विजयी झाले. ही लढत अत्यंत चुरशीची होती,पिंपळनेर गणाचा निकाल काय लागतो या निकालाकडे परिसरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून होते. त्याचप्रमाणे भाजप प्रणित अपक्ष उमेदवार रोशनी पगारे यांनीसुद्धा चिकसे गणातून बाजी मारली. पिंपळनेर गणातून अत्यंत अटीतटीची लढत मानली जात होती,अखेर पिंपळनेर परिसरात राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाले आहे. पिंपळनेर व चिकसे गणातून भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून भविष्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे.