पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – आग्रा महामार्गावर शनिवारी पहाटे ५.२५ वाजता शिरवाडे फाटा येथे लक्झरी बस व पिक अपमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी आहे. या अपघाताची माहिती मिळताच शिरवाडे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली. या अॅम्बुलन्समधून जखमींना पिंपळगाव येथील सरकारी हॅास्पीटल येथे दाखल केले. तर दोन जखमींना यांना राधाकृष्ण हॅास्पिटल पिंपळगाव येथे दाखल करण्यात आले आहेत.
लक्झरी बस नंबर. MP 04 PA 4132 ही मालेगावकडून नाशिककडे जात होती. तर पिक अप गाडी नंबर. MH 14 AH 9170 ही रस्ता क्रॅास करत होती. यावेळी हा अपघात झाला. या अपघातात राजाराम लक्ष्मण चोथवा (४५) मु पो बनपाडा ता सुरगाणा जिल्हा नाशिक यांचा मृत्यू झाला. तर अशोक नथु गायकवाड (२८) मु पो शिराटा ता सुरगाणा), हंसराज पांडुरंग अलबाड ( २३) मु पो हतरुंडी ता सुरगाणा, केशव गावीत (५५, मु पो हतरुंडी ता सुरगाणा) हे जखमी झाले आहे.