पिंपळगाव बसवंत: जिल्ह्यातील महत्वाची मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत १२ मे पासून बंद असलेले कांदा लिलाव सोमवार २४ पासून पूर्ववत करण्यात आल्याने कांदा उत्पादकांना दिलासा लाभला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कोरोना नियमांचे पालन व्हावे यास्तव पिंपळगाव बाजार समितीत आरटीसीपीआर चाचणी केलेल्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रवेश दिला गेला.
पिंपळगाव बाजार समितीत सोमवारी ३८० ट्रॅक्टर, ३१० पिकअप मधून उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यास जास्तीत जास्त २०२०, कमीत कमी १०००, सरासरी १५०१ बाजारभाव मिळाला.
….
पहिल्याच दिवशी २०० आरटीसीपीआर चाचणी
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रवेशासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आरटीसीपीआर चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने बाजार समितीच्या प्रवेश द्वारावर शेतकऱ्यांची तपासणी अहवाल बघून प्रवेश दिला गेला. पहिल्याच दिवशी बाजार समितीच्या केंद्रावर २०० हून अधिक शेतकऱ्यांच्या आरटीसीपीआर चाचण्या पार पडल्या.
…