सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पिंपळगाव बसवंत मध्ये आगीचा तांडव, चार तासानंतर अशी आली आग आटोक्यात…वाचा संपूर्ण माहिती

मार्च 22, 2025 | 6:46 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250322 WA0011

पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पिंपळगाव बसवंत परिसरातील बाबा मंगल कार्यालयाच्या लगत रद्दीचा, पॅलेटचा कारखाना फ्रेम आणि बांबूचे दुकान आणि फरसाण गोडाऊनला भीषण आग लागली. रद्दी असल्याने क्षणातच या आगीने रौद्र अवतार घेतला व संपूर्ण परिसर जळुन खाक झाला. या आगीत अंदाजे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत तात्काळ घटनास्थळी पिंपळगाव बसवंतचे माजी सरपंच भास्करराव बनकर, सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, युवा नेते गणेश बनकर, नितीन बनकर यांनी घटनास्थळी भेट दिली तर याबाबत दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी देखील पिंपळगावच्या घटनेनंतर दिल्लीहून सर्व शासकीय यंत्रणेनीशी संपर्क केला.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की,मुबंई महामार्ग लागत असलेल्या रद्दीचा, पॅलेटचा कारखाना, फ्रेम आणि बांबूचे दुकान छोट्या कारखान्याला शुक्रवार शॉटसर्किटने अचानक पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. तातडीने पिंपळगाव अग्निशमन घटनास्थळी पोहचवले व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र आगीचे मोठे डोम असल्याने आग विजवण्यासाठी पिंपळगाव अग्निशामक अपुरे पडत होते. त्यानंतर देवळा, निफाड, दिंडोरी, ओझर, नाशिक या ठिकाणच्या नगर परिषद आणि एचएएलची अग्निशमन जवानांनी तातडीने दाखल घेत फायरप्रूफ असलेली आधुनिक गाड्या आल्या. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. शेवटी फोम युक्त पाणी सोडून तब्बल ३० ते ३५ बंब पाणी आग आटोक्यात आणण्यासाठी लागली.

महावीतरण विभागाचा गलथान कारभार
पिंपळगाव बसवंत परिसरातील एनडीसी सी कॉलनी परिसरात आणि कुरणाची आग ताजी असताना पुन्हा बाबा मंगल कार्यालय परिसरात आग लागल्याने पिंपळगाव महावीतरण विभागाच्या गलथान कारभाराची बाबा समोर येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

तीन गॅस सिलेंडरचा झाला स्फोट…
पिंपळगाव बाबा मंगल कार्यालय जवळ तसेच बांबूंच्या दुकानाला भीषण आग लागली त्यात फरसाणचे गोडाऊन देखील जळून खाक झाले. त्यात काही गॅस सिलेंडर होते. ते जवळपास गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

आगीने धारण केले रौद्ररूप…
परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली ती आग विझवण्यासाठी अग्निशामक जवान प्रयत्न करत होते. मात्र नागरिकांनी रस्त्यात गाड्या लावून ठेवल्याने अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या अग्निशामक बंप त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होती. तर सर्व्हिस रोडला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रस्त्यावरच वाहने लावून आग पाहण्यासाठी गेले होते. परिणामी अग्निशामक कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. यावेळी पोलिसांनी आणि काही तरुणांनी रस्ता मोकळा करण्यासाठी मदत केल्याने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक कर्मचाऱ्यांना मदत झाली.

आग आटोक्यात येईना…..
पिंपळगाव बसवंत शहरातील बाबा मंगल कार्यालयाजवळ लागलेली भीषण आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक बम कमी पडत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदेच्या अग्निशामक बंब त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी जवळपास दहा अग्निशामक बंब आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र तरीही आग आटोक्यात येत नव्हती. जवळपास चार ते पाच तास आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक जवानांना प्रयत्न करावे लागले.

नागरिकांचा जीव धोक्यात
बाबा मंगल कार्यालय तसेच परिसरात पाच ते सहा मोठे रुग्णालय आहे. हा परिसर रेसिडेंटल एरिया आहे मात्र या परिसरात असे अवैध कारखाने स्थापन करण्यात आले. याला परवानगी देण्यासाठी प्रशासनाने तेथील स्थनिक नागरिकांची परवानगी घेतली का? ही चर्चा रंगली आहे.

एक वर्षांपूर्वी गादीचा कारखाना जळून खाक……
एक वर्षांपूर्वी या ठिकाणी अवैधरित्या स्थापन केलेल्या गादीच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. परिसर मोठ्या प्रमाणात आगीत खाक झाला होता. ही घटना घडूनही प्रशासनाने या परिसरात अशी अवैधरित्या असवेदनशील कारखाने तसेच व्यवसाय स्थापन करून देऊ नये. यासाठी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या आगीने तांडव धारण करून हा परिसर जाळून खाक केला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

गाडी फसली
पिंपळगाव शहरात गेल्या दोन दिवसापासून सातत्याने आग लागण्याची घटना घडत आहे. गुरुवार रोजी सायंकाळी एका गोडाऊनला आग लागली होती. मात्र त्या गोडाऊन पर्यंत गाडी घेऊन जाण्यासाठी रस्त्याला कोणतीही वाहन नसताना सदर गाडी रस्त्याच्या बाजूने फसली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाने उचलली ही ठोस पावले…

Next Post

आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे; तज्ज्ञांची समिती स्थापन होणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
jail11
क्राईम डायरी

सहा तडिपारांचे शहरात वास्तव्य….पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑक्टोबर 5, 2025
IMG 20251004 WA0392 1
स्थानिक बातम्या

चांदवडच्या पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाच्या अनुषंगाने असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑक्टोबर 5, 2025
IMG 20251004 WA0374
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक….मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

ऑक्टोबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, रविवार, ५ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 5, 2025
FB IMG 1759682974066
संमिश्र वार्ता

आज आहे कोजागिरी पौर्णिमा; असे आहे त्याचे महत्त्व

ऑक्टोबर 5, 2025
G2Z45ldXEAAahvP 1024x843 1
मुख्य बातमी

सरकारी भरतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

ऑक्टोबर 4, 2025
WhatsApp Image 2025 10 04 at 7.59.57 PM
संमिश्र वार्ता

अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला मिळालं बळ!

ऑक्टोबर 4, 2025
Next Post
CM Devendra Fadnavis

आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे; तज्ज्ञांची समिती स्थापन होणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011