पिंपळगाव बसवंत – पिंपळगाव बसवंत येथील सामाजिक कार्यात भरीव योगदान असलेल्या समाजभूषण स्व. सुवालाल धाडीवाल यांच्या १६ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत व कोरोना लॉकडाऊन काळात गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये या उदात्त हेतूने शहरात सोशल डिस्टनसिंगचे पालन करत आयोजित रक्तदान शिबिरातून १७१ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या १७१ रक्तदात्याना अपघाती एक लाखांच्या विम्याचे वाटप शिवसेनेचे जेष्ठ नेते भास्कर बनकर यांच्या प्रमुख उपस्थिती यावेळी करण्यात आले.
पिंपळगाव शहरातील समाजभूषण स्व. सुवालाल धाडीवाल युवक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक बांधीलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमांद्वारे केलेल्या अवाहनानुसार व गर्दी न टाळण्याचा हेतूने दूरध्वनीद्वारे केलेल्या संपर्कानुसार जवळपास १७१ नागरिकांनी सोशल डिस्टन्ससिंगचे काटेकोर पालन करत रक्तदानं शिबिरात सहभाग नोंदविला.
रक्तदान शिबिर प्रसंगी सुभाष धाडीवाल, नेमीचंद धाडीवाल, गणेश बनकर,सतीश मोरे, नारायण पोटे, परेश शहा, अल्पेश पारख, संदीप कोचर,,राजेंद्र सोनी, गुलाबचंद पगारिया, रवींद्र जैन, संजय धाडीवाल, बाळू पारख आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी शीतल धाडीवाल, संदेश सोळंकी, पराग धाडीवाल, दिनेश बोरा,शुभम धाडीवाल, प्रितेश छाजेड ,बबलू धाडीवाल, दिनेश बागरेचा ,योगेश भेटेवरा, आशिष धाडीवाल,हेमंत कांकरिया, रोशन पोटे,शुभम शिंदे,ऋषभ जाहिगीरदार,दर्शन पवार,बापू कुयटे, यश धाडीवाल, अमित संकलेचा, कृष्णा धाडीवाल आदींनी परिश्रम घेतले.