नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बसवंत टोमॅटो व्यापा-याकडे काम करणा-या तरुणाने मालेगाव शहर पोलीस ठाण्या शेजारीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मालेगाव येथे त्याची सासूरवाडी असून गेल्या दोन दिवसापासून तो येथे होता अशी माहिती समोर आली आहे. राजू नबाब शहा (२७) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.
मालेगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाशेजारील दत्त मंदिरालगतच्या कंपाऊंड गेटच्या भिंतीच्या अँगलला पिवळी पट्टी बांधून गळफास घेत शहा याने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर तरुणास तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.