पिंपळगाव बसवंत: मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडाव्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाहीर सभा शनिवार २ एप्रिल रोजी होणार आहे. या सभेसाठी निफाड तालुक्यातून हजारो मनसैनिक जाणार असल्याची माहिती मनसे तालुकाध्यक्ष संजय मोरे यांनी दिली.शिवतीर्थावर मनसेची होणाऱ्या भव्य सभेला जाण्यासाठी पिंपळगाव बसवंत शहरात संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गोसावी, विधानसभा अध्यक्ष शिवमूर्ती खडके, मनवीसे विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे, तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, शहराध्यक्ष राजू भवर, सरचिटणीस निलेश सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.