पिंपळगाव बसवंत : तालुका विधी सेवा प्राधिकरण निफाड, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपळगाव ब. व वकिल संघ पिंपळगाव ब. यांच्या संयुक्त विद्यमाने पॅन इंडिया जनजागृती मोहीम अंतर्गत कारसूळ तालुका निफाड येथे कायदे विषयक शिबिर आयोजित केले होते.यावेळी कार्यक्रमासाठी पिंपळगाव ब.दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश पी.के.कापडे, पिंपळगाव ब.वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.बाबुराव जाधव,पालखेड मंडल अधिकारी शितल कुयटे ॲड.सुरज चव्हाण, ॲड.सुभाष शेलार,ॲड.जनार्दन देवरे,ॲड. रामाकांत मुंदडा, ॲड.प्रविण हाडोळे,ॲड.महेश पवार,ॲड.श्रीराम भडांगे,ॲड.प्रकाश पगारिया, ॲड.रणजित चव्हाण,ॲड. प्रभाकर घुमरे, ॲड.त्र्यंबक वाटपाडे, ॲड.तुषार घुमरे, ॲड.संतोष गवळी, ॲड.रविंद्र गवळी, सहय्यक अधिक्षक शिवाजी जाधव,लिपिक तुषार भानुवंशे हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कारसूळ कादवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब शंखपाळ यांना देण्यात आले तसेच कारसूळ ग्रामपंचायतच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा उपस्थितीतांच्या हास्ते शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला यानंतर खंडेराव शंखपाळ यांनी प्रास्ताविक केले या शिबिरात पिंपळगाव ब. न्यायालयाचे मुख्य न्यायधिश पि.के.कापडे, ॲड.सुरज चव्हाण व ॲड.सुभाष शेलार, यांनी कारसूळ,नारायण टेंभी व परिसरातील ग्रामस्थांना अमली पदार्थ व त्यांचे दुष्परिणाम तसेच सातबारा उतारा खरेदी विक्री करतांना घेवायची काळजी माहिलांचे हाक्क व अधिकार महिलसबलीकरण, बाललैंगिक अत्याचार आदी विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच आशा ताकाटे, उपसरपंच उज्ज्वला गांगुर्डे,सदस्य शामराव शंखपाळ,देवेंद्र काजळे,मधुकर ताकाटे,श्रीनिवास गवळी, भिमराव शंखपाळ,साहेबराव गवळी, पोलीस पाटील रमेश ताकाटे,बाजीराव ताकाटे, संदिप काजळे,संतोष ताकाटे,आण्णासाहेब गांगुर्डे,कैलास पगार,उध्दव काजळे,बाळासाहेब गांगुर्डे,संतोष जाधव,चंद्रभान गाडे,रामराव ताकाटे, बाबाजी उगले, शामराव शंखपाळ,तुकाराम काजळे,विठ्ठल गाडे, ज्ञानेश्वर कंक,अशोक जाधव,नानासाहेब उगले,रामनाथ पगार, ग्रामसेवक राजेंद्र वाघ,नंदु गांगुर्डे,सुरज शेख, दिलीप कोपटे,भाऊराव गांगुर्डे व नंदकिशोर बैरागी आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन रविंद्र गवळी तर आभार देवेंद्र काजळे यांनी केले.