पिंपळगाव बसवंत: येथील कोविड सेंटरसह शहर परिसरातील रुग्णालयातील ऑक्सिजनचा असलेला साठा मागणीचा तुलनेत कमी असल्याने रुग्णांचे जीव टांगणीला लागल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाची चिंता वाढती आहे. कोरोनाची दाहकता लक्षात घेता तातडीने कोविड सेंटरला अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची सध्या तरी गरज आहे.
नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात तालुक्यात वाढती कोरोना बाधितांची संख्या ही लक्षणीय आहे. दररोज वाढणारे रुग्ण संख्या बघता सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटलच्या बेड संख्येत मर्यादा येत आहे. पिंपळगाव कोविड सेंटरमध्ये सध्यस्थीतीत १०० विना ऑक्सिजन बेडची व्यवस्था तर उपजिल्हा रुग्णालयात ८१ ऑक्सिजनच्या बेडची व्यवस्था आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या बघता ऑक्सिजन, बेड अपुरे ठरत असल्याने रुग्णाचे हाल पे हाल सुरू आहे.त्यातच पिंपळगाव कोविड सेंटरसह परिसरातील रुग्णालयात ऑक्सिजनचा असलेला साठा मागणीच्या तुलनेत अगदी कमी आहे. प्रशासनाने अतिरिक्त ऑक्सिजन बेडसह अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा वाढविणे गरजेचे आहे.
….