पिंपळगाव बसवंत: शहरातील बाजार समितीकडे टोमॅटो घेऊन जाणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने समोरील ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला.या अपघातात पिकअप वाहनातील एक युवक ठार झाला आहे.याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार देवळा तालुक्यातील दहीवड येथील शेतकरी पिकअप वाहनात आपला टोमॅटो माल घेऊन जात असताना पिंपळगाव शहरातील जोपुळ रोडवर वाहनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट समोरील ट्रॅकवर जाऊन जोरदार आदळल्याने पिकअप वाहनातील विशाल मधुकर वाघ, वय २२, रा. दहीवड ता. देवळा यांचा मृत्यू झाला आहे.याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहे.
गतिरोधकाची मागणी….
टोमॅटो हंगाम जोरात सुरू झाल्याने पिंपळगाव शहराकडून बाजार समितीकडे येणाऱ्या भरघाव येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. परिसरात जागोजागी गतिरोधक बसविल्यास वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहण्यास मदत होईल.