पिंपळगाव बसवंत: निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी स्थापन केलेल्या भिमाशंकर ग्रामोदय संस्थेस नवभारत ग्रुप यांच्या कडून नाशिक जिल्ह्यात सर्वोच्च स्तरावर काम करणारी ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था म्हणून दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन ३० ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई येथे पुरस्कारीत करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संस्थेच्या सचिव नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य मंदाकिनी दिलीप बनकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी संचालक उमेदमल जैन, सारिका मोरे, सुजाता घोटेकर, नवभारत ग्रुपचे निमिश माहेश्वरी, एम इ टी चे संचालक राहुल मोरे, व्हा चेअरमन औदुंबर धनवट आदीं उपस्थित होते.
उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळाली.
ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार होवा या उद्देशाने कै शंकरराव बनकर व भिमाबाई बनकर यांच्या नावाने भीमाशंकर ग्रामोदय संस्थेची स्थापना आमदार दिलीप बनकर यांनी केली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत संस्थेने जिल्हाभरात चागला नावलौकिक कमावला आहे. नवभारत ग्रुपच्या वतीने पुरस्कार देऊन जो सन्मान केला त्यामुळे यापुढेही उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळाली.
मंदाकिनी बनकर
सचिव, भिमाशंकर ग्रामोदय संस्था, पिंपळगाव